विविध प्रकारच्या प्रसारमाध्यमासाठी बातमीलेखन, मुलाखतलेखन, जाहिरातलेखन तसेच निबंध लेखन या संदर्भात विध्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळेल व विविध स्तरावर त्याचे उपयोजन विद्यार्थ्यांकडून केले जाईल. 

गोमंतकातील लोकसंस्कृती आणि लोकपरंपरा यांचा विद्यार्थ्यांना परिचय होईल.

चित्रपटाच्या विविध संकल्पना विद्यार्थ्यांना ज्ञात होतील. चित्रपट क्षेत्राशी निगडित अभिनय, दिग्दर्शन, पटकथा लेखन, सिनेमॅटोग्राफी, संकलन, ध्वनी, संगीत, नृत्य दिग्दर्शन, ग्राफिक्स इत्यादी वेगवेगळ्या क्षेत्रात करियर करण्याची संधी उपलब्ध होईल. 

मुलाखत या संप्रेषण कौशल्यामध्ये संवादशास्त्राचे महत्व विद्यार्थ्यांना कळेल व मुलाखत घेण्याचे कौशल्य त्यांच्यात आत्मसात होईल. त्याचबरोबर मुलाखतीसाठी वापरल्या जाणा-या विविध माध्यामांचीही माहिती मिळेल. 

विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास कोणकोणत्या गोष्टीतून घडविता येते याचे वेगवेगळे नमुने त्यांच्यासमोर ठेवणे व त्या दृष्टीकोनातून त्यांच्या व्यक्तिमत्वातही बदल घडवून येतील. यामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल व ते स्वतःला चांगल्याप्रकारे व्यक्त करू शकतील.

या अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना 'कथा'या वांङ्मय प्रकाराचा परिचय करून दिला जाईल. कथा या वांङ्मय प्रकाराचे स्वरूप व व्याप्ती, कथेचे विविध विशेष, कथेचे विविध घटक व मराठी कथेची वाटचाल यासंबंधीची माहिती विद्यार्थ्याना मिळेल.

या अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्याना 'कादंबरी' या वांङ्मय प्रकाराविषयी माहिती दिली जाईल. कादंबरीचे स्वरूप,व्याप्ती, कादंबरीचे घटक, कादंबरीचे प्रकार, मराठी कादंबरीची वाटचाल त्यातील महत्त्वाचे टप्पे तसेच एकै कादंबरीचा प्रत्यक्ष परिचय दिला जाईल. 

या अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्याना 'काव्यशास्त्र' या विषयाचा परिचय होणार आहे. काव्य कशाला म्हणावे यापासून काव्याची भारतीय व पाश्चात्य अभ्यासकानी सांगितलेली विविध काव्यलक्षणे, प्रयोजने तसेच प्रतिभाशक्ती न शब्दशक्ती या विषयांचा विद्यार्थ्यांना परिचय होईल. 

या अभ्यासक्रमाअंतर्गत विद्यार्थ्याना प्राचीन मराठी वांङ्मयाचा परिचय होईल. या वांङ्मयाच्या निर्मितीची कारणे, त्या वांङ्मयाचे स्वरूप, या वांङमयाच्या रचनेची वैशिष्ट्ये तसेच प्राचीन काळातील महत्त्वाचे रचनाकार व त्यांचे वांङ्मय यांचा परिचय विद्यार्थ्याना होईल. 

या कोर्सच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना सूत्रसंचालन या भाषिक कोशल्याचा परिचय करून दिला जाईल जेणेकरुन ते एखाद्या कार्यक्रम नियोजनबद्धरित्या आयोजन व सूत्रसंचालन करू शकतील.